पुस्तक परिचय – बिहारमधील पूर समजून घेताना
[भारतात पाण्याच्या समस्या बहुतकरून तुटवड्याशी संबंधित असतात. एकच क्षेत्र असे आहे, जिथे नद्यांचे पर महत्त्वाचे असतात, आणि तेही दरवर्षी. हे क्षेत्र म्हणजे हिमालयाच्या पायथ्यापासून गंगा नदीपर्यंतचे. या क्षेत्रातील नद्यांचा प्रेमाने अभ्यास करणारा महाभाग म्हणजे डॉ. दिनेश कुमार मिश्रा. सुमारे अर्धशतकाच्या काळात या टाटानगरस्थित अभियंत्याने उत्तर बिहारमधील नद्यांचा अत्यंत तपशीलवार अभ्यास करून साठेक.पुस्तके व शोधनिबंध लिहिले …